‘पंतप्रधानांचे धोरण पाणी प्या, तुमचे वाईन प्या!’: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

 


विशेष प्रतिनिधी, मुंबई: "उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचे अत्यंत सुजाण आवाहन केले आहे. मात्र, या आवाहनावरही हीन पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या संजय राऊतांना महाविकास आघाडी सरकारच्या काळातील स्वतःच्या वाईन विक्री धोरणाचा विसर पडला आहे. तुमचे धोरण 'वाईन प्या' असे होते, तर पंतप्रधानांचे धोरण 'पाणी प्या' असे आहे. त्यामुळे पाणी पिण्याच्या आवाहनावर संजय राऊतांनी वाईन घेतल्यासारखे झिंगून बोलू नये," अशी बोचरी आणि सणसणीत टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'खिमा-पाव' आणि मतांचे लांगूलचालन

पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, अलीकडच्या काळात संजय राऊतांना 'वडापाव' नव्हे तर 'खिमा-पाव' अधिक प्रिय वाटू लागला आहे, कारण त्यातून त्यांना विशिष्ट मतपेढीचे लांगूलचालन करायचे आहे. कोकणातील कोळी बांधवांच्या उत्पन्नवाढीसाठी जर 'मत्स्य पाव'च्या माध्यमातून नवी संधी निर्माण केली जात असेल, तर राऊतांच्या पोटात का दुखते? तुम्ही कितीही अफजलखान आणि औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचा प्रयत्न केला, तरी कोकणी बांधव तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी बकऱ्यांचा बळी देण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी राऊतांना 'जनाब संजय राऊत' असा टोला लगावला. "बकरी ईद निमित्त घरात सण साजरा करण्यास आमचा विरोध नाही, पण सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यावर उघड्यावर बळी देण्याचे समर्थन राऊत करत आहेत. आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी उघड्यावर नमाज आणि बळी देण्याच्या प्रथांना कडाडून विरोध केला असता आणि राऊतांच्या पेकाटात लाथ घातली असती," असेही बन म्हणाले.

रोहित पवारांना आजोबांच्या कारकिर्दीचा अभ्यासाचा सल्ला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बन यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या १० वर्षांच्या केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळावर बोट ठेवले. रोहित पवारांनी आधी आपल्या आजोबांच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करावा. पवार केंद्रात मंत्री असताना कांद्याचा प्रश्न का सुटला नाही? काँग्रेस सरकारने कधीही कांद्याला १५ रुपयांचा हमीभाव दिला नाही. याउलट, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली असून, येत्या चार दिवसांत कांद्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

इंधन साठा आणि साठेबाजीवर स्पष्टीकरण

देशातील पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना मुख्य प्रवक्त्यांनी सांगितले की, भारताकडे पुरेसा इंधनसाठा शिल्लक आहे. मात्र, काही समाजकंटक जाणीवपूर्वक साठेबाजी करत असल्यामुळे काही जिल्ह्यांत अचानक ५० ते ७५ टक्के मागणी वाढली आहे. जागतिक स्तरावर, विशेषतः चीनमध्ये २५ ते ३० टक्के इंधन दरवाढ झाली असताना, पंतप्रधान मोदींच्या आर्थिक नियोजनामुळे भारतात ही वाढ केवळ ४ ते ५ टक्के एवढीच मर्यादित राहिली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाची परिस्थिती नियंत्रणात येताच हे दर पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील आणि सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी कटीबद्ध आहे, असे बन यांनी शेवटी स्पष्ट केले.


Labels:

Maharashtra Politics, BJP Maharashtra, Sanjay Raut, Navnath Ban, Narendra Modi, Rohit Pawar, Sharad Pawar, Fuel Prices India, Onion Crisis Maharashtra, Mumbai News

Search Description:

BJP State Main Spokesperson Navnath Ban strongly criticized Shiv Sena UBT leader Sanjay Raut over his remarks on PM Narendra Modi. Ban raised questions on MVA's wine policy, Rohit Pawar's criticism on farmers' issues, and clarified India's fuel stock position.

Hashtags:

#SanjayRaut #NavnathBan #BJP #ShivSena #MaharashtraPolitics #Narendra Modi #RohitPawar #SharadPawar #OnionPrice #MarathiNews


‘पंतप्रधानांचे धोरण पाणी प्या, तुमचे वाईन प्या!’: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका  ‘पंतप्रधानांचे धोरण पाणी प्या, तुमचे वाईन प्या!’: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका Reviewed by ANN news network on ५/२८/२०२६ ०२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".