मुंबई: सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताला चारी बाजूंनी अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि ‘रामराज्या’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, या मुख्य उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने रविवार, १७ मे २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानात ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ अत्यंत चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक महायज्ञाला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, राष्ट्ररक्षण आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना केली.
या सोहळ्याचे सनातन संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवरून जगभर थेट प्रसारण करण्यात आले होते. प्रभादेवी येथील मुख्य यज्ञस्थळी ७,००० हून अधिक भाविकांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली, तर भारतातील विविध राज्यांसह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, चीन, अर्जेंटिना, पोलंड, थायलंड आणि ब्राझील अशा जगभरातील ४० देशांतील हजारो भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा ऑनलाईन लाभ घेतला.
भौतिक सामर्थ्याला आध्यात्मिक बळाची जोड
महायज्ञाचे महत्त्व विशद करताना सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले, "आज आपला देश चारी बाजूंनी विविध आव्हानांनी वेढलेला आहे. अशा वेळी भारताच्या रक्षणासाठी केवळ भौतिक सामर्थ्य पुरेसे नाही, तर त्याला आध्यात्मिक बळाचीही जोड हवी. आदिशक्तीच्या 'दशमहाविद्यां'मध्ये अत्यंत शक्तिशाली मानल्या गेलेल्या श्री राजमातंगीदेवीचा हा महायज्ञ भारताला एक अभेद्य आध्यात्मिक कवच प्रदान करेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ज्या मुंबापुरीत (मुंबईतून) धर्मकार्याचा श्रीगणेशा केला, त्याच भूमीतून राष्ट्रउभारणीचे हे एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे."
शक्तिशाली वैदिक अनुष्ठानाने वातावरण भारावले
या महायज्ञाचे पौरोहित्य इरोड (तामिळनाडू) येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी केले, तर शिवाचार्य श्री. गुरुमूर्ती हे यज्ञाचे मुख्य आचार्य होते. सनातन संस्थेच्या संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यजमान यांच्यासह शेकडो सहयजमान यांनी हे शक्तिशाली वैदिक अनुष्ठान केले. शंखनाद आणि राष्ट्रकल्याणाच्या महासंकल्पाने यज्ञाचा प्रारंभ झाला. श्रीमहालक्ष्मी अष्टोत्तर नामावलीच्या उच्चारात कुंकूमार्चन आणि श्री राजमातंगी देवीच्या मूलमंत्रांनी यज्ञकुंडात आहुती समर्पित करण्यात आल्या. त्यानंतर 'महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या' सामूहिक पाठाने या मंगल विधीची सांगता झाली.
सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे अभूतपूर्व दर्शन
सध्या देशभरात सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या पुनर्निर्माणाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून, १ हजार वर्षांपूर्वी परकीय आक्रमक महंमद गझनीने भग्न केलेल्या आणि प्रत्यक्ष भगवान चंद्रदेवांनी स्थापित केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे थेट मुंबईतील यज्ञस्थळी दर्शन घेण्याची अभूतपूर्व सुवर्णसंधी भाविकांना मिळाली. या अध्यात्मिक सोहळ्यासोबतच यज्ञस्थळी लावण्यात आलेल्या सनातननिर्मित अध्यात्म, राष्ट्ररक्षण, आयुर्वेद आणि धर्मशास्त्र या विषयांवरील अनमोल ग्रंथ अन् फलक प्रदर्शनालाही मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या महायज्ञाला आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य त्रिपाठी, स्वांतत्र्यवीर स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभूदेसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मंदिर विश्वस्त उपस्थित होते.
Labels:
Sanatan Sanstha,Shri Rajamatangi Mahayagn,Prabhadevi Mumbai,Spiritual Shield for India,Ram Rajya,Somnath Swabhiman ParvaSearch Description: Sanatan Sanstha organized 'Shri Rajamatangi Mahayagn' at Prabhadevi, Mumbai for India's spiritual protection and Ram Rajya. Attended by thousands globally across 40 countries.
Hashtags:
#RajamatangiMahayagn #SanatanSanstha #MumbaiEvents #SpiritualIndia #RamRajya #SomnathSwabhimanParva #NationalProtection
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२६ ०९:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: