पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील 'रेड झोन'मध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. या निर्णयामुळे 'रेड झोन'मधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शहरातील इतर प्रामाणिक करदात्यांनाही अशाच प्रकारच्या सवलती दिल्या जाव्यात, अशी मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ५०० फुटांपर्यंतच्या मिळकतींना करमाफी देण्याची मागणी आम्ही करत आहोत, तिचाही सकारात्मक विचार व्हावा असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, भापकर यांनी या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न उपस्थित करत हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याचे अधोरेखित केले आहे.
Pimpri Chinchwad
Property Tax
Ajit Pawar
Maruti Bhapkar
Red Zone
#PCMC #PropertyTax #RedZone #AjitPawar #PimpriChinchwad #LocalNews #MarutiBhapkar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: