महापालिका प्रशासनावर मनसेचा हल्लाबोल
नवी मुंबई, (प्रतिनिधी): नवी मुंबईच्या घणसोली परिसरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी घणसोली विभाग कार्यालयावर 'थाळीनाद मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चात मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चादरम्यान, मनसेच्या शिष्टमंडळाने घणसोली विभागातील वाढत्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तुटलेल्या कचराकुंड्या आणि त्यामुळे रस्त्यावर पडलेला कचरा, यामुळे नागरिकांना होणारा त्रास, रस्ते आणि उद्यानांची झालेली दुरावस्था याचे पुरावे म्हणून फोटोही अधिकाऱ्यांनी सादर केले.
या वेळी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर या समस्यांवर योग्य वेळेत तोडगा काढला नाही, तर यापुढे मनसे अधिक उग्र आंदोलन करेल. प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
MNS Protest
Ghansoli Protest
Navi Mumbai Civic Issues
Thalinad Morcha
#MNS #NaviMumbai #Ghansoli #Protest #CivicIssues #ThalinadMorcha #MaharashtraPolitics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: