संत कबीर उद्यानात 'देशी वनस्पती, झुडपे व वेली यांचे घनवन' प्रकल्पाचे उद्घाटन
देशी प्रजातींमुळे जैवविविधतेचे संवर्धन; पक्षी, प्राणी व सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित अधिवास
महापालिका आणि 'वनराई' सामाजिक संस्थेचा संयुक्त उपक्रम
पिंपरी, (प्रतिनिधी): आपल्या पुढील पिढीसाठी शहरातील हरित आणि निरोगी वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. महापालिका आणि 'वनराई' या सामाजिक संघटनेच्या वतीने संत कबीर उद्यानात 'देशी वनस्पती, झुडपे व वेली यांचे घनवन' या प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
शहराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता पर्यावरणीय संतुलन राखणे आवश्यक असल्याचे सांगून, आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, देशी प्रजातींच्या वनस्पतींनी साकारलेले हे घनवन पक्षी, प्राणी व सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित अधिवास ठरेल. या प्रकल्पात पांडुडा, करवंद, अडुळसा, कढीपत्ता, पिंपळ, जाई, जुई यांसारख्या ३० पेक्षा अधिक देशी प्रजातींची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी, 'असे उपक्रम शहराला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जातात आणि इतर उद्यानांमध्येही याची पुनरावृत्ती केली जाईल,' असे सांगितले. तसेच, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी या दुर्मिळ व औषधी वनस्पतींचे जतन व संवर्धन करण्याचे काम महापालिका करणार असल्याचे म्हटले.
Pimpri-Chinchwad
Urban Forestry
Green Initiative
PMC
Commissioner Shekhar Singh
#PCMC #GreenPimpri #UrbanForestry #PMC #Environment #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: