पुनर्वसनासंबंधी विविध मागण्यांवर सकारात्मक बैठका; हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत बरखास्त
जसखार आणि फुंडे गावातील भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू
जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने लक्ष घातल्यामुळे आंदोलक समाधानी
उरण, (प्रतिनिधी): प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनांमुळे आणि झालेल्या यशस्वी बैठकांमुळे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने सुरू केलेले 'चॅनेल बंद' आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. विस्थापितांच्या पुनर्वसनासह इतर महत्त्वाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.
या आंदोलनाची घोषणा १५ ऑगस्टपासून होणार होती. मात्र, त्यापूर्वीच रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या प्रश्नावर लक्ष घालून अनेक सकारात्मक निर्णय घेतले. यामध्ये हनुमान कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबांना मौजे जसखार आणि फुंडे येथील विकसित जमिनीतील भूखंडांचा ताबा घेण्यासाठी विधीवत पूजा करण्यात आली आहे, तसेच मंजूर नकाशानुसार भूखंड वाटप सुरू झाले आहे. केंद्रीय बंदर विभागाच्या सहसचिवांनी लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन जमीन देण्याचा ठोस निर्णय घेतला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश कोळी यांनी सांगितले की, १ ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागाने हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत बरखास्त केली आहे. या सर्व सकारात्मक घडामोडींमुळे आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.
Sheva Koliwada
Protest Suspended
JNPA Displaced
Rehabilitation
Urban
#ShevaKoliwada #JNPA #Protest #Rehabilitation #Uran #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: