पिंपरी, (प्रतिनिधी): सामाजिक न्यायासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येतील आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुसूचित जाती-जमातींशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत महापालिकेतील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या, रमाई घरकुल योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा झाली. आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आनंदराव अडसूळ यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, उपेक्षित घटकांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात आणि त्यांना न्याय देण्यासाठी विविध शासन निर्णयांचा योग्य अर्थ लावून कार्यवाही करावी. आयोगकडे दाखल झालेल्या प्रकरणांवर वेळेत अंमलबजावणी करावी. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतील लाभार्थ्यांना चांगली घरे द्यावीत आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पारदर्शकता राखून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार पात्र कर्मचाऱ्यांची नियमानुसार नियुक्ती करावी, अशी मागणी केली. तसेच, सफाई कामगारांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
Anand Adsul
Scheduled Caste Commission
Pimpri Chinchwad
Social Justice
Administrative Meeting
#AnandAdsul #SCSTCommission #PimpriChinchwad #SocialJustice #Maharashtra #PCMC

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: