ताओ आर्किटेक्चरचे संचालक मनीष बँकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद


वास्तू रचनेच्या संकल्पनेवर एस. बी. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी, पुणे, (प्रतिनिधी): वास्तू रचनाकाराने नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग वास्तू उभारताना कौशल्याने केला पाहिजे. उपलब्ध जमीन, पाण्याचे स्त्रोत, झाडे, पशु-पक्षी यांचा अधिवास धोक्यात न आणता निसर्गाचे कमीत कमी नुकसान होईल, असा विचार करून आधुनिक वास्तू उभारावी, असा कानमंत्र ताओ आर्किटेक्चरचे संचालक मनीष बँकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) संचलित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲन्ड डिझाईन येथे प्रसिद्ध आर्किटेक्ट मनीष बँकर यांनी वास्तू रचनेची संकल्पना आणि आर्किटेक्चरमधील नाविन्यपूर्ण प्रयोग या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून विविध प्रकल्पांची माहिती दिली. यात प्रकल्पाची उपलब्ध जागा, मातीचा पोत, हवामान, पर्जन्यमान, उष्णता, वाऱ्याची दिशा आणि पाण्याची उपलब्धता यांनुसार घरांचे बांधकाम आणि नियोजन कसे करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसनही केले.


  • Manisha Banker

  • Architecture

  • PCET

  • S. B. Patil College

  • Sustainable Design

 #Architecture #SustainableDesign #ManishaBanker #PCET #SBPatilCollege #PuneNews #Design #Environment


ताओ आर्किटेक्चरचे संचालक मनीष बँकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद ताओ आर्किटेक्चरचे संचालक मनीष बँकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद Reviewed by ANN news network on ८/०८/२०२५ ११:२२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".