'मांस विक्री बंदीचा निर्णय जुन्या सरकारचा'; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले



मुंबई (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय आपल्या सरकारने घेतलेला नाही. हा निर्णय १९८८ पासून जुन्या सरकारनेच लागू केला आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना जोरदार फटकारले.

मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, माध्यमांतून ही माहिती मिळाल्यावर मी याबाबत महानगरपालिकांकडे विचारणा केली. त्यावेळी १९८८ साली जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दरवर्षी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे महापालिकांकडून मला सांगण्यात आले. अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता.

लोकांनी काय खावे हे ठरविण्यात सरकारला कोणताही रस नाही, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे १९८८ सालच्या निर्णयावर आजच काही निर्णय घेतल्यासारखे वादंग निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर विनाकारण आरोप करू नयेत.'


Maharashtra, Politics, Government, Devendra Fadnavis, Meat Ban, Controversy

#MaharashtraPolitics #DevendraFadnavis #MeatBan #Maharashtra #BJP #ShivSena #GovernmentDecision #IndependenceDay


'मांस विक्री बंदीचा निर्णय जुन्या सरकारचा'; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले 'मांस विक्री बंदीचा निर्णय जुन्या सरकारचा'; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले Reviewed by ANN news network on ८/१४/२०२५ ०७:२१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".