वाशिम (प्रतिनिधी): वाशिम-हिंगोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर हिंगोली शहराच्या जवळ एका भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही घटना हिंगोली येथील डेंटल कॉलेजजवळ मराठवाडा धाब्याजवळ घडली. एमएच २७ एक्स ६१८२ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गणेश अनिल ठाकरे (वय २५) आणि मोहन ठाकरे (वय २१) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महेशपूर येथील रहिवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहन रस्त्याच्या बाजूला काढून रहदारी सुरळीत केली. दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Labels: Road Accident, Washim, Hingoli, Fatal Crash, Pickup Truck, Highway
Search Description:
Hashtags: #RoadAccident #Washim #Hingoli #FatalCrash #HighwayAccident #MaharashtraNews #Tragedy
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: