‘अखंड भारताचे स्वप्न मोदीजींच्या राज्यात लवकरच सत्यात उतरेल’ - उज्ज्वल निकम
पुणे (प्रतिनिधी): भारताचे विभाजन भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी एक वाईट घटना होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड भारताचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल, असा विश्वास ज्येष्ठ विधीज्ञ आणि राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने 'विभाजन विभिषिका दिन' निमित्त आयोजित मूक यात्रेदरम्यान ते बोलत होते.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही मूक यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, सारसबाग येथून पुरम चौकापर्यंत काढण्यात आली. यावेळी निकम म्हणाले की, १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले, याचा आनंद नक्कीच आहे. पण १४ ऑगस्ट ही तारीख आम्ही कधीही विसरू शकत नाही, कारण याच दिवशी काही व्यक्तींनी भारतीयांसोबत वाईट व्यवहार केला होता. स्वातंत्र्य हे थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून मिळाले आहे. ते आम्ही कधीच विसरू नये.
यावेळी मूक यात्रेत उज्ज्वल निकम यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pune, BJP, Partition Horrors Remembrance Day, Ujjwal Nikam, Akhand Bharat, Narendra Modi
#UjjwalNikam #BJP #Pune #PartitionHorrorsRemembranceDay #AkhandBharat #NarendraModi #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: