योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारली जातील; १५ कोटींची तरतूद
पहिल्या टप्प्यात ४५ लाभार्थ्यांना कर्जमंजुरीपत्रं प्रदान
स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला मिळणार चालना
सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 'सिंधुरत्न समृद्ध योजना' राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत येत्या दोन-तीन महिन्यांत जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारली जातील, अशी माहिती या योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ४५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना कर्जमंजुरीपत्रे देण्यात आली. त्यापैकी ४ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज मंजुरीच्या धनादेशांचे वितरण आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात करण्यात आले.
Sindhudurg
Tourism Development
Sindhuratna Samruddha Yojana
Cottages
Deepak Kesarkar
#Sindhudurg #Tourism #Maharashtra #DeepakKesarkar #Development
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: