ऑपरेशन 'क्रिस्टल ब्रेक' अंतर्गत सात आरोपींना अटक
सुरत आणि मुंबईतून हवालाद्वारे पैशांचे व्यवहार सुरू होते
भोपाळ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी भोपाळच्या जगदीशपूर येथे अवैधपणे सुरू असलेल्या मेफेड्रोन (MD) ड्रग्स कारखान्याचा पर्दाफाश करून, ९२ कोटी रुपये किमतीचे ६१.२ किलोग्राम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. 'ऑपरेशन क्रिस्टल ब्रेक' अंतर्गत केलेल्या या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५४१.५३ किलोग्राम कच्चा माल आणि रसायनेही जप्त करण्यात आली आहेत, ज्यात मेथीलीन डाइक्लोराइड, एसीटोन, मोनोमेथिलमाइन (एमएमए), हायड्रोक्लोरिक ऍसिड (एचसीएल) आणि २-ब्रोमो यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासणीत समोर आले आहे की, हवालाच्या माध्यमातून सुरत आणि मुंबईतून भोपाळमध्ये पैशांचे हस्तांतरण केले जात होते. या ऑपरेशनमध्ये सुरत आणि मुंबई पोलिसांनी डी.आर.आय.ला मदत केली.
डी.आर.आय.ला गुप्त माहिती मिळाली होती की, हा कारखाना एका परदेशी ड्रग्स माफियाच्या सांगण्यावरून चालवला जात होता. हा कारखाना जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यासाठी विशेष पद्धतीने तयार करण्यात आला होता, असेही प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
DRI
MD Drugs
Drug Bust
Bhopal
Operation Crystal Break
#DRI #DrugBust #Bhopal #MDDrugs #Crime #India

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: