पुणे, दि. २७ ऑगस्ट, २०२५: पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ३ लाख रुपयांची रोकड, १ लाख रुपयांचे मोबाईल फोन आणि ४ लाख रुपयांचे हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे.
गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणारे काही इसम वाघोली परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. आरोपींची नावे रोहित संजय गोरे (वय ३०), अजय दत्तात्रय पवार (वय २८) आणि ओम सुंदर खरात (वय २३) अशी आहेत.
या आरोपींनी पुणे शहरातील चंदननगर, पर्वती, आंबेगाव पोलीस स्टेशन आणि कळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ४ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Pune Crime
Fake Gold
Fraud
Pune Police
Arrest
#PunePolice #FakeGoldScam #Fraud #CrimeNews #PuneCrime
Reviewed by ANN news network
on
८/२७/२०२५ ०६:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: