राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पुराच्या पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू; अनेक कुटुंबांचे स्थलांतर सुरू
जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत असून, पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ४२ फूट ०९ इंच इतकी झाली, तर धोका पातळी ४३ फूट आहे.
नदीचे पाणी शहरात अनेक ठिकाणी शिरल्याने कसबा बावडा ते शिये आणि शिरोली येथील सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कुंभी नदीच्या पुरात एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला असून, शाहूवाडी तालुक्यातील काही वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे.
राधानगरी धरण क्षेत्रातून सायंकाळी पाच क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडल्याने एकूण पाच दरवाजे उघडले आहेत, ज्यातून ८,६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आठ राज्य मार्ग, ३४ प्रमुख जिल्हा मार्ग आणि ३० ग्रामीण रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनाने सतर्कता बाळगत पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर आणि कागल तालुक्यांमधून आतापर्यंत अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Kolhapur Flood
Panchganga River
Radhanagari Dam
Maharashtra Floods
Disaster
#Kolhapur #Floods #PanchgangaRiver #Maharashtra #RadhanagariDam #NaturalDisaster
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: