२७७ कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून सुटका; प्रवासाला मिळणार गती
औंध ते शिवाजीनगर मार्गिका वाहतुकीसाठी खुली; उर्वरित काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
पुणे, (प्रतिनिधी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
अंदाजे २७७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी दूर होऊन वाहतूक व्यवस्थापन दीर्घकाळ सुनिश्चित होणार आहे. या प्रकल्पाची एक मार्गिका (औंध ते शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. शिवाजीनगर आणि औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर बाणेर आणि पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे पीएमआरडीएने नियोजन केले आहे.
या उड्डाणपुलामुळे नागरिकांना या भागातून प्रवास करणे अधिक सुकर होणार आहे.
Pune Flyover
Devendra Fadnavis
Savitribai Phule Pune University
PMRDA
Infrastructure
#Pune #Flyover #DevendraFadnavis #PMRDA #Infrastructure #TrafficSolution
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: