मुंबई-पुणे प्रवासातील अडथळे कमी होणार; देशातील सर्वात उंच पूल आणि मोठा बोगदा साकारणार
समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली कामाचा आढावा
महामंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांची उपस्थिती
पुणे, (प्रतिनिधी): विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक’ प्रकल्पाची पाहणी केली. या भेटीत समितीने प्रकल्पाच्या कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतला. या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कामगार व अभियंते हे काम पूर्ण करत असल्याबद्दल समितीने त्यांचे कौतुक केले.
‘खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील घाटमार्ग टाळता येणार असून, वाहतुकीतील अडथळे कमी होतील. या प्रकल्पांतर्गत ९ किमी लांबीचा आणि २३ मीटर रुंदीचा बोगदा तसेच १८५ मीटर उंचीचा पूल उभारण्यात येत आहे. हा पूल देशातील सर्वात उंच पूल ठरणार असून, त्यामुळे प्रवासाला अधिक सुलभता आणि आराम मिळणार आहे.
Missing Link Project
Legislative Committee
Mumbai-Pune Expressway
Infrastructure
Maharashtra
#MissingLinkProject #MumbaiPuneExpressway #Infrastructure #Maharashtra #RahulKul #MSRDC

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: