राज्यात फलोत्पादन वाढवण्यासाठी अभिनव उपक्रम राबवण्याच्या सूचना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सुपारीचा समावेश करण्याचे निर्देशशेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फलोत्पादनाचे क्षेत्र वाढवावे - गोगावले
पुणे, (प्रतिनिधी): राज्यामध्ये जीआय (भौगोलिक निर्देशांक) नामांकन प्राप्त झालेल्या फळपिकांच्या पॅकेजिंग आणि ब्रँडिंगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक आहे, असे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. फळांची निर्यात वाढवण्यासाठी फळपिकांचे क्लस्टर वाढवावेत आणि त्याअनुषंगाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
साखर संकुल येथे फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषि आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहून त्यानुसार कामकाज करावे आणि फलोत्पादन वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विभागाचा महसूल वाढवावा, असे श्री. गोगावले यांनी सांगितले. शासनाच्या रोपवाटिका बळकट करण्यासाठी तसेच सुपारी आणि खजूर यांसारख्या पिकांचा शासनाच्या योजनांमध्ये समावेश करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अमरावती आणि नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
Bharat Gogawale
Horticulture Department
GI Tag
Pune
Agriculture
#BharatGogawale #Horticulture #GI #Agriculture #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: