मतचोरीच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांचे संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर

 


'संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले' - भाजप नेते नवनाथ बन यांचा घणाघात

'सामनाची भाषा काँग्रेसच्या मुखपत्रासारखी' - नवनाथ बन

मुंबई, (प्रतिनिधी): शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे राहुल गांधींचे पगारी नोकर बनले आहेत, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावरही राऊत काँग्रेसच्या वकिलासारखे त्यांची बाजू मांडत आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

ते म्हणाले की, जर मतचोरी झाली असती, तर लोकसभेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असत्या का? जेव्हा लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतात, तेव्हा ती मतचोरी नसते. मात्र, विधानसभेत जनतेने भाजपला भरभरून आशीर्वाद दिले की तुम्हाला पोटदुखी होते.

सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन म्हणाले, “काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रातही वापरली जाणार नाही अशी हीन भाषा राऊत वापरत आहेत.” तसेच, महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या लंडनवारीवर टीका करण्याचा राऊत यांना कोणताही अधिकार नाही, असे सांगत बन यांनी भाजपचे मंत्री आशिष शेलार मराठ्यांचा इतिहास असलेल्या तलवारीसाठी लंडनला गेले होते, अशी माहिती दिली. “कोविड काळात जनता तडफडत असताना तुम्ही सर्व घरात बसून होता, तेव्हा कोणी कुठे लंडनवारी केली, याचे सर्व तपशील आमच्याकडे आहेत,” असा इशाराही त्यांनी दिला.



  • Sanjay Raut

  • Navnath Ban

  • Maharashtra Politics

  • BJP

  • Shiv Sena UBT

#SanjayRaut #NavnathBan #MaharashtraPolitics #BJP #ShivSenaUBT #EVM

मतचोरीच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांचे संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर मतचोरीच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांचे संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर Reviewed by ANN news network on ८/१८/२०२५ ०३:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".