पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट'; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; नदीकाठच्या रहिवाशांनी दक्षता घ्यावी
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज, १८ ऑगस्ट रोजी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील तीन तासांत पुणे, रायगड, ठाणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती मंत्रालयातून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
धरण अपडेट्स:
नीरा देवघर धरण: सकाळी ८:३० वाजता धरणातून ६,८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण ९८.२८% भरले असून, पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
वीर धरण: पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पर्जन्यमानामुळे सकाळी ११ वाजता १८०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला, जो दुपारी १२ वाजता वाढवून ६,२३८ क्युसेक करण्यात आला. नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भाटघर धरण: हे धरण १००% भरल्यामुळे दुपारी २:३० वाजता ८,६३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यात जलविद्युत केंद्राद्वारे १,६३१ क्युसेक आणि धरणाच्या स्वयंचलित दरवाजांद्वारे ७,००० क्युसेक पाण्याचा समावेश आहे.
पवना धरण: पवना धरण ९७.४५% भरलेले असून, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे दुपारी २ वाजता जलविद्युत केंद्राद्वारे ८०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण लक्षात घेता धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
Pune
Red Alert
Heavy Rain
Dam Update
Flood Warning
Maharashtra
#PuneRains #RedAlert #DamUpdate #Maharashtra #FloodWarning #HeavyRain #Monsoon

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: