नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आयुक्तांचा रिक्षातून प्रवास
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांची उभारणी - महापालिका आयुक्त
पुणे (प्रतिनिधी): पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांची उभारणी प्राधान्याने केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. वाहतूक कोंडीवर त्वरित आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर काम सुरू असून, येत्या वर्षभरात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसबा विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्यासह आयुक्तांनी पाहणी दौरा केला. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या भुयारी मार्गांच्या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक आहे. या प्रकल्पाचा अहवाल अंतिम टप्प्यात आला असून, यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यास मदत होईल.
या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि आमदार रासने यांनी रिक्षातून प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रस्त्यांची रखडलेली कामे वेगात पूर्ण करणे आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
Pune, PMC, Traffic, Metro, Commissioner, Hemant Rasane, Infrastructure, Road Safety
#Pune #PMC #Traffic #Infrastructure #PuneTraffic #HemantRasane #RoadSafety #PuneCity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: