२८० कोटी रुपयांच्या भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्यासाठी प्रयत्न करणार - शिंदे
पुणे, (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात जाऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजा केली. राज्यामध्ये चांगला पाऊस पडावा, बळीराजा सुखी व्हावा आणि राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस यावेत, अशी प्रार्थना त्यांनी भीमाशंकराकडे केली.
पूजा झाल्यानंतर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना शिंदे म्हणाले की, ते स्वतः एक शिवभक्त असून दरवर्षीप्रमाणेच श्रावणातील दर्शनासाठी आले आहेत. हे प्राचीन देवस्थान असून येथे दर्शन घेऊन समाधान आणि आनंद मिळतो, असेही ते म्हणाले.
शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा २८० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केलेला आहे. येथे येण्यासाठीचा रस्ता चांगला करण्यासह भाविकांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील.
Eknath Shinde
Bhimashankar Temple
Pune
Maharashtra
Hindu God
#EknathShinde #Bhimashankar #Pune #Maharashtra #Temple #Hinduism

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: