मुस्लिम बँकेच्या अध्यक्षपदी तन्वीर इनामदार, उपाध्यक्षपदी आयुब शेख यांची बिनविरोध निवड

 


'सर्वसामान्यांची बँक' हा नावलौकिक कायम ठेवणार - नवीन पदाधिकाऱ्यांचे आश्वासन

पुणे, (प्रतिनिधी): 'दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'च्या अध्यक्षपदी तन्वीर पी. इनामदार आणि उपाध्यक्षपदी ऍड. आयुब शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

तन्वीर इनामदार हे माहिती-तंत्रज्ञान विषयातील तज्ञ आहेत, तर ऍड. आयुब शेख हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. दोघांनीही "सर्वसामान्यांची बँक हा बँकेचा नावलौकिक पुढे कायम ठेवू आणि बँकेला आणखी प्रगतीपथावर नेऊ," असे आश्वासन दिले.

१९३१ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेच्या राज्यभरात २३ शाखा आहेत.



  • Muslim Cooperative Bank

  • Pune

  • Tanveer Inamdar

  • Ayub Shaikh

  • Banking

 #Pune #MuslimBank #Banking #TanveerInamdar #AyubShaikh

मुस्लिम बँकेच्या अध्यक्षपदी तन्वीर इनामदार, उपाध्यक्षपदी आयुब शेख यांची बिनविरोध निवड मुस्लिम बँकेच्या अध्यक्षपदी तन्वीर इनामदार, उपाध्यक्षपदी आयुब शेख यांची बिनविरोध निवड Reviewed by ANN news network on ८/१८/२०२५ ०७:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".