गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

दापोलीतील आंजर्ले आणि मंडणगडमधील वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्याचा निर्णय

 

ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धन व संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत होईल – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्वरित कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

रत्नागिरी, (प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील मौजे आंजर्ले आणि मंडणगड तालुक्यातील मौजे वेळास येथील समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी ‘जैवविविधता वारसा स्थळ’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले की, जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा आणि मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या स्थळांना ‘वारसा स्थळ’ घोषित केल्यास जलद गतीने होणारा जैवविविधतेचा ऱ्हास रोखण्यास मदत होईल. तसेच, या निर्णयामुळे ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.

आंजर्ले आणि वेळास येथील किनारे ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहेत. विभागीय वन अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणात त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

या स्थळांना वारसा स्थळ घोषित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तातडीने ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.



  • Ratnagiri

  • Biodiversity Heritage Site

  • Olive Ridley Turtles

  • Anjarle

  • Velas

 #Ratnagiri #Biodiversity #HeritageSite #OliveRidleyTurtles #Anjarle #Velas #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा