खडकी येथील जबरी चोरीतील आरोपीला ११ महिन्यांनी अटक
पुणे: गेल्या
अकरा महिन्यांपासून फरार
असलेल्या मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत
पाहिजे असलेल्या आरोपीला पुणे
शहर गुन्हे शाखा
युनिट ४ ने
मिरज-सांगली येथे
अटक केली आहे.
आफरीद उर्फ
गुड्या सलीम शेख
(वय २४, रा.
इंदिरा नगर, खडकी)
असे या आरोपीचे नाव
आहे.
खडकी पोलीस
स्टेशनमध्ये दाखल असलेल्या जबरी
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे
शाखेला वरिष्ठांकडून आदेश
मिळाले होते. युनिट ४ चे
पथक खडकी परिसरात पेट्रोलिंग करत
असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव
मगदूम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एका
गुप्त बातमीदाराकडून माहिती
मिळाली की, अकरा
महिन्यांपूर्वी
हत्याराचा धाक दाखवून जबरी
चोरी करणारा आरोपी
आफरीद शेख हा
मिरज, सांगली येथे
राहत आहे.
या माहितीच्या आधारे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय
वाघमारे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन
मिरज येथे तपास
पथक पाठवले. १२ ऑगस्ट २०२५
रोजी युनिट ४
च्या पथकाने मिरज
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरा
हॉटेल चौकातून आरोपी
आफरीद शेख याला
ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने
खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत
साथीदारांसोबत
जबरी चोरी केल्याची कबुली
दिली.
अपर पोलीस
आयुक्त पंकज देशमुख,
पोलीस उपायुक्त निखिल
पिंगळे आणि सहायक
पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनाखाली
ही कारवाई करण्यात आली
आहे.
Crime, MCOCA, Arrest, Pune Police, Crime Branch, Khadki
#Pune #Crime #MCOCA #PunePolice #CrimeBranch #Khadki #Arrest #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: