गाडीच्या चावीवरून झालेल्या वादातून पुतण्याचा मामेभावाकडून खून
पुणे: गाडीच्या चावीवरून झालेल्या किरकोळ
वादातून एका पुतण्याने आपल्याच मामेभावाचा खून
केल्याची धक्कादायक घटना लोहीयानगर येथे
घडली आहे. खडक पोलिसांनी या
घटनेनंतर अवघ्या दोन तासांत
आरोपीला जेरबंद करण्यात यश
मिळवले आहे.
ही घटना
६ ऑगस्ट २०२५
रोजी लोहीयानगर येथील
इनामके मळा, गल्ली
नंबर ३ येथे
घडली. फिर्यादी यांचा
भाऊ सागर राजू
अवघडे (वय ३३)
आणि त्याचा मामेभाऊ सूरज
नंदू सकट (वय
२५) यांच्यात गाडीच्या चावीवरून वाद
झाला. या वादातून संतापलेल्या सूरज
सकट याने सागर
अवघडे याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि
खाली पाडून त्याचा
खून केला.
या घटनेनंतर, फिर्यादी यांनी
खडक पोलीस ठाण्यात तक्रार
दाखल केली आणि
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम
१०३ (१) नुसार
गुन्हा नोंदवला. आरोपी सूरज सकट
हा गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळून
गेला होता.
गुन्ह्याचा तपास
सुरू असताना, पोलीस
निरीक्षक शर्मिला सुतार आणि मनोजकुमार लोंढे
यांनी सर्व्हेलन्स पथकाला
योग्य त्या सूचना
दिल्या. तपास पथकातील पोलीस
अंमलदार आशिष चव्हाण आणि
इरफान नदाफ यांना
त्यांच्या बातमीदाराकडून
माहिती मिळाली की,
आरोपी सूरज सकट
हा लोहीयानगरमधील म्हसोबा मंदिर
चौकात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक
पोलीस निरीक्षक अर्जुन
कुदळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने
सापळा रचून आरोपी
सूरज सकट याला
मोठ्या शिताफीने पकडले.
त्याला ६
ऑगस्ट रोजी अटक
करण्यात आली.
ही यशस्वी
कामगिरी अपर पोलीस आयुक्त
राजेश बनसोडे, पोलीस
उपायुक्त ऋषिकेश रावले आणि
सहायक पोलीस आयुक्त
अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
आहे.
Crime, Pune, Murder, Arrest, Police, Khadak Police Station
#Pune #Crime #Murder #PunePolice #KhadakPolice #Lohiyanagar #Arrest #PoliceInvestigation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: