पिंपरी, (प्रतिनिधी): प्रशासन आणि लोकसहभागातून मोठा सकारात्मक बदल घडवता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेची कुदळवाडी येथील पब्लिक स्कूल (क्र. ८९) आहे. या शाळेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपली ओळख 'टेक्नोसेव्ही शाळा' म्हणून निर्माण केली आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी केले.
७ ऑगस्ट २०२५ रोजी या डिजिटल शाळेमध्ये 'प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड' या उपक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशासन अधिकारी संगीता बांगर, माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त मोरे यांनी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या शाळेत सॉफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी, बोनाफाईड दाखला, गुणपत्रिका आणि प्रवेश फॉर्म यांसारखी कामे यशस्वीरित्या राबवली जात आहेत. शाळेतील बालवाडीचे ११८ आणि इयत्ता पहिली ते आठवीच्या ९७० विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेतली जात आहे.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची थेट चाचणीही घेतली. हे सॉफ्टवेअर प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि आधुनिक डिजिटल अनुभव देणार असल्याचे सांगण्यात आले.
Pimpri Chinchwad
Digital School
Kudalwadi School
Kiran Kumar More
Education
#PCMC #DigitalSchool #KudalwadiSchool #TechSavvy #Education #PimpriChinchwad

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: