पुणे - कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मोका कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या १० महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला कोंढवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई ४ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली असून, आरोपी हर्ष संतोष जाधव (वय १९) याला कात्रज-कोंढवा रोडवरील श्रीराम चौकातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, मोका गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हर्ष जाधव हा श्रीराम चौकात येणार आहे. ही माहिती मिळताच तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशानुसार सापळा रचला. पोलीस अंमलदार विकास मरगळे आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर, विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहास मोरे, सुजित मदन, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, राहुल शेलार, विजय खेंगरे, राहूल थोरात, सुरज शुक्ला, अनिल बनकर आणि केशव हिरवे यांचा समावेश होता.
Crime News, Pune Police, MCOCA, Kondhwa Police Station, Arrest, Wanted Criminal.
#KondhwaPolice #PunePolice #MCOCA #Arrest #CrimeNews #MaharashtraPolice #PoliceAction #WantedCriminal

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: