पुणे - नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. सार्थक बाळासाहेब भगत (वय २२, रा. कोल्हेवाडी, पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३५,५०० रुपये किमतीचे अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ४ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली.
नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे अंमलदार बंटी मोरे आणि स्वप्नील मगर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार सार्थक भगत याच्याकडे अग्निशस्त्र असून तो कोल्हेवाडी बस स्टॉप येथे थांबला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले.
आरोपी सार्थक भगत याच्या विरोधात यापूर्वी हवेली पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव आणि सतिश खोत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Crime News, Pune Police, Nanded City, Illegal Firearm, Arrest.
#NandedCityPolice #PunePolice #FirearmArrest #CrimeNews #IllegalWeapon #PolicePatrolling #CriminalArrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: