पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते उपस्थित
इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी उमेदवार
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था): राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणास्थळावर विविध नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील महिन्याच्या ९ तारखेला होणार आहे. या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Vice President Election
C. P. Radhakrishnan
NDA
Nomination
B. Sudarshan Reddy
#VicePresidentialElection #CPRadhakrishnan #NDA #IndianPolitics #NarendraModi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: