‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या नाशिकच्या विकास मेदडे यांना ‘सेना मेडल’

 


इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य गावाच्या भूमिपुत्राला शौर्य सन्मान

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईतील कामगिरीबद्दल गौरव

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून जानेवारी महिन्यात सन्मान प्रदान

नाशिक, (प्रतिनिधी): भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य गावाचे भूमिपुत्र आणि १८ मराठा लाईफ इंन्फट्रीचे हवालदार विकास रामदास मेदडे यांना ‘सेना मेडल’ हा शौर्य सन्मान जाहीर झाला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून येत्या जानेवारी महिन्यात त्यांना हे पदक प्रदान केले जाईल.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य केले होते. त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या हवालदार विकास मेदडे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण आणि साहसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या शौर्यामुळे नांदुरवैद्य गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.



  • Sena Medal

  • Indian Army

  • Operation Sindoor

  • Vikas Medade

  • Nashik

 #SenaMedal #IndianArmy #Braveheart #VikasMedade #Nashik #OperationSindoor

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या नाशिकच्या विकास मेदडे यांना ‘सेना मेडल’ ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या नाशिकच्या विकास मेदडे यांना ‘सेना मेडल’ Reviewed by ANN news network on ८/२२/२०२५ ०३:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".