मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव
पुस्तकात फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा आणि कार्याचा आढावा
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारले 'ध्येयवादी देवेंद्रजी'
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येयवादी नेतृत्वाखालील कार्याचा गौरव करणारे 'ध्येयवादी देवेंद्रजी' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपा प्रदेश कार्यालयात करण्यात आले. हे पुस्तक भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारले आहे.
यावेळी विजय शिंदे म्हणाले की, "ज्या नेत्याच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक नवी ओळख मिळाली, त्यांच्या कार्यावर आधारित हे कॉफी टेबल बुक साकारण्याचा मान मला मिळाला, याचा मला आनंद आहे."
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "हे पुस्तक म्हणजे केवळ देवेंद्रजींच्या कार्याचा आढावा नसून, त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाची गाथा आहे. हे पुस्तक महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असून, भावी पिढ्यांनाही त्यांच्या कार्याची प्रेरणा देत राहील."
या कॉफी टेबल बुकमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय, जनसामान्यांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि राज्याच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा वेध घेण्यात आला आहे.
Devendra Fadnavis
Book Launch
Ravindra Chavan
BJP
Maharashtra Politics
#DevendraFadnavis #BJP #Maharashtra #RavindraChavan #BookLaunch #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: