अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज
निवारा केंद्रांमध्ये भोजनासह सर्व सुविधा उपलब्ध; आयुक्त शेखर सिंह यांनी केली पाहणीबचावकार्यासाठी अग्निशमन दल आणि आरोग्य विभाग कार्यरत
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून पाणी सोडल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने पुराने बाधित झालेल्या भागातील सुमारे ९५० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली.
महापालिकेने काल रात्रीपासूनच नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये आणि महापालिका शाळांमध्ये हलवण्यास सुरुवात केली. या ठिकाणी भोजनासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयुक्त शेखर सिंह स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, अतिरिक्त आयुक्तांनीही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत.
भाटनगर, पिंपळे गुरव, लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, पिंपळे निलख, रामनगर बोपखेल आणि संजय गांधी नगर यांसारख्या भागांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांच्या मदतीसाठी अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Pimpri-Chinchwad
Flood Relief
Citizen Evacuation
PMC
Monsoon
#PCMC #PimpriChinchwad #Floods #ReliefWork #Monsoon #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: