हिंदू समाजात संताप; हिंदु जनजागृती समितीने कठोर कारवाईची मागणी केली
मुंबई, दि. ३० ऑगस्ट (प्रतिनिधी): ठाणे जिल्ह्यातील डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर १५० पेक्षा जास्त ट्रक भरलेल्या गणेशमूर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत. हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी जबाबदार असलेल्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यातील अनेक ट्रक्सवर 'व्हीकल ऑन बीएमसी ड्युटी' असे लिहिलेले असल्याने त्या मुंबई महानगरपालिकेच्या असण्याची शक्यता आहे. सरकारने यावर्षी गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सवाचा' दर्जा दिला असतानाच असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिंदु जनजागृती समितीने यापूर्वीच सरकारला निवेदन देऊन गणेशमूर्ती कचऱ्याच्या गाडीत नेऊ नये, कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन झालेल्या मूर्तींची विटंबना होऊ नये, तसेच त्या कचरा किंवा खाणीत टाकू नये अशी मागणी केली होती. तरीही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याने हे गंभीर कृत्य घडले, असे समितीने म्हटले आहे.
हिंदु धर्मशास्त्रानुसार गणेश विसर्जन वाहत्या पाण्यात केले जाते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरणाचा अधिकार आहे आणि या घटनेमुळे त्याचा भंग झाला आहे, असे समितीने म्हटले आहे. सरकारने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर निर्देश जारी करावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.
Ganesh Idol Immersion
Mumbai
Thane
Hindu Janajagruti Samiti
Religious Sentiments
Waste Management
#Ganeshotsav #Mumbai #Thane #GaneshVisarjan #HinduJanajagrutiSamiti #ReligiousSentiments
Reviewed by ANN news network
on
८/३०/२०२५ ०९:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: