‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ सारख्या चित्रपटांचे निर्माते प्रद्योत पेंढरकर यांचे मार्गदर्शन
मुंबई, दि. ३० ऑगस्ट (सां. प्रतिनिधी): ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवामध्ये ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हस्तसामुद्रिक शास्त्राचे तज्ज्ञ प्रद्योत पेंढरकर गणेशभक्तांना हस्तरेषांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल उत्सुकता असते. ही उत्सुकता शांत करण्यासाठी प्रद्योत पेंढरकर, ज्यांनी 'शेर शिवराज' आणि 'सुभेदार' सारख्या ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली आहे, ते या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी २०१४ पासून हस्तसामुद्रिक शास्त्राचे औपचारिक शिक्षण घेऊन अनेकांना मदत केली आहे.
या रोचक विषयावर प्रद्योत पेंढरकर यांची मुलाखत पत्रकार सर्वेश देशपांडे घेणार आहेत. हा कार्यक्रम ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, आयोजकांनी अधिकाधिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Palmistry
Ganeshotsav
Mumbai
Pradyot Pendharkar
Public Event
Brahman Seva Mandal
#Palmistry #Ganeshotsav #Mumbai #PradyotPendharkar #PublicInterview #BrahmanSevaMandal

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: