महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गुन्हे दाखल
नाशिक : नाशिक पोलिसांनी ४० हून अधिक दुकानफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला ठाणे येथून अटक केली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे नाशिकमधील चार वाईन शॉपमधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना रामनिवास उर्फ राम मंजु गुप्ता (वय ३७, रा. दिवा, ठाणे) या आरोपीची माहिती मिळाली. ठाणे येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ६०,००० रुपयांची मोपेड गाडी जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्याने नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये वाईन शॉप फोडल्याची कबुली दिली.
Nashik Police
Crime
Theft
Arrest
Burglar
#NashikPolice #Crime #Theft #Arrest #WineShop #Nashik

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: