आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
०२ वर्षांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडमधून हद्दपार
जानेवारीपासून ११४ गुन्हेगारांवर कठोर कारवाई
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५ यांनी १० सराईत गुन्हेगारांवर तडीपार (हद्दपार) कारवाई केली आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यात दोन टोळ्यांमधील ७ गुन्हेगार आणि कलम ५६ नुसार ३ गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत परिमंडळ ५ कार्यालयाकडून १६ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. (MPDA) अंतर्गत, १० मोका (MCOCA) कारवाईमध्ये ६७ गुन्हेगारांना आणि आजपर्यंत ३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ११४ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
परिमंडळ ५ मधून तडीपार केलेल्या गुन्हेगारांची यादी
Pune Police
Tadipar
Crime
Law Enforcement
Public Safety
#PunePolice #Tadipar #Crime #LawEnforcement #Pune #PublicSafety

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: