संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते गौरव
पुणे: राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रतिष्ठेच्या 'संसदरत्न' या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले.
यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. 'प्राईम पॉइंट फाऊंडेशन'च्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना 'संसदरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांचे यंदाचे १५ वे वर्ष होते आणि या वर्षी १७ खासदारांना हा मान मिळाला.
राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय आणि लोक-देशहिताचे मुद्दे मांडून प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्रा. डॉ. कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुणे शहरासाठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.
Medha Kulkarni, Sansad Ratna Award, Rajya Sabha MP, Kiran Rijiju, Parliamentary Performance, Pune, Maharashtra Politics
#MedhaKulkarni #SansadRatna #RajyaSabha #ParliamentAward #KirenRijiju #Pune #MaharashtraPolitics #ParliamentaryPerformance #WomenInPolitics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: