उजनी धरणातून भीमा नदीत तब्बल ५१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीला पूर, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर आला असून, नदीवरील अनेक छोटे-मोठे बंधारे भरून वाहत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने, सखल भागातील नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Ujani Dam, Bhima River, Flood Alert, Solapur District, Water Release, Monsoon Rain, Disaster Management
#UjaniDam #BhimaRiver #Solapur #FloodAlert #Monsoon #MaharashtraFloods #WaterRelease #DisasterManagement #PuneRains
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: