जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्याला एसीबीने पकडले

 


नांदेड, ०४ जुलै २०२५: समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी (कंत्राटी) श्रीमती सुजाता मधुकरराव पोहरे यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी १५,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

यातील तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणासाठी अनुसूचित जातीच्या जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्याकडे अर्ज केला होता. हे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात श्रीमती सुजाता पोहरे यांनी तक्रारदाराकडे ३०,०००/- रुपयांची लाच मागणी केली होती. काम झाल्यानंतर १५,०००/- रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले होते.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर, दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी सापळा कार्यवाहीचे आयोजन केले. समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील सुजाता पोहरे यांच्या कक्षात ही कारवाई करण्यात आली. यावेळी लोकसेविका सुजाता पोहरे यांनी तक्रारदाराकडून १५,०००/- रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली.

लाच स्वीकारल्यानंतर महिला लोकसेविका सुजाता पोहरे यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड येथे गु..नं २५५/२०२५, कलम () भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथील पोलीस निरीक्षक श्री. करीम खान पठाण करत आहेत.

या कारवाईचे मार्गदर्शन श्री. संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड आणि पर्यवेक्षक अधिकारी श्री. प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. संपर्क पत्ता: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड, नागार्जुनसागर बिल्डिंग, स्नेहनगर / श्रीनगर, नांदेड. संपर्क क्रमांक: ०२४६२-२५३५१२ आणि टोल फ्री क्रमांक: १०६४. मा. पोलीस अधीक्षक यांचा संपर्क क्रमांक ९३५९०५६८४० आहे.

 Crime, Corruption, Bribery, Nanded, ACB, Government Official

 #Nanded #ACB #Bribe #Corruption #MaharashtraPolice #AntiCorruption #GovernmentTransparency


जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्याला एसीबीने पकडले जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्याला एसीबीने पकडले Reviewed by ANN news network on ७/०५/२०२५ १२:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".