पुणे, २५ जुलै: पुणे
महानगरपालिकेच्या भामा आसखेड
पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वितरण व्यवस्थेत बदल
करण्यात येणार आहे.
सविस्तर बातमी
पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रेसनोटनुसार, भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांतील नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या या बदलाची नोंद घ्यावी आणि पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बदलामुळे विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूरचाळ, वडगावशेरी (अंशतः), खराडी (अंशतः), चंदननगर (अंशतः) या ठिकाणच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत काही प्रमाणात बदल संभवतो.
वरील भागातील सध्याचे आणि नियोजित बदलाचे वेळापत्रक pmc.gov.in या पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ही माहिती बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी दिली आहे.
Pune Water Supply, PMC, Water Schedule Change, Bama Askhed Project, Pune News
#PuneWaterSupply #PMC #PuneNews #WaterCut #BamaAskhed #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: