मुंबई, २६ जुलै: मुंबईतील
माटुंगा परिसरात एका ७४
वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील
सोनसाखळी खेचून पसार झालेल्या
दोन आरोपींना माटुंगा
पोलिसांनी अटक केली
आहे.
सविस्तर बातमी
१९
जुलै २०२५ रोजी
रात्री ८.४०
वाजण्याच्या सुमारास माटुंगा पोलीस
ठाण्याच्या हद्दीत जैन मंदिरातून
दर्शन घेऊन पायी
घरी जात असलेल्या
श्रीमती विजया हरिया (वय
७४) यांच्या गळ्यातील
सोन्याची चेन दुचाकीवरून
आलेल्या दोन अनोळखी
इसमांनी खेचून पळ काढला
होता.
गुन्ह्याचा
तपास करत असताना
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे
मोहित अशोक संगिशेट्टी
(वय २२, रा.
कुर्ला पश्चिम) आणि रोहित
ओमसिंग गौंड (वय १९,
रा. कुर्ला पश्चिम)
या दोन आरोपींना
अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ९.८० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (किंमत ९०,००० रुपये) आणि गुन्ह्यासाठी वापरलेली काळ्या-सफेद रंगाची के.टी.एम. कंपनीची ड्युक २०० (क्रमांक एम. एच. ०३-डी.टी.-३६२५, अंदाजित किंमत १,५०,००० रुपये) अशी एकूण २ लाख ४० हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ही कामगिरी माटुंगा पोलीस ठाण्याचे
गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उप निरीक्षक सुनील
पाटील, तसेच शिपाई जुवाटकर, देशमाने, मेटकर, तोडासे, बहादुरी, सोनवलकर
यांनी केली
आहे.
Crime News, Mumbai Police, Chain Snatching, Online Gambling, Matunga Police Station, Arrest, Property Seized
#MumbaiPolice #CrimeNews #ChainSnatching #Matunga #OnlineGambling #Arrest #MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: