एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवचे तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदकासह लक्षणीय यश

 


पिंपरी, पुणे, दि. १२ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम गणेश जाधव याने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावून लक्षणीय कामगिरी केली आहे.

फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया (भारतीय तलवारबाजी संघटना) च्या वतीने १३ व्या मिनी आणि ७ व्या चाइल्ड नॅशनल चॅम्पियन २०२५-२६ चे आयोजन नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांच्या हस्ते सक्षम गणेश जाधव यास पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याचे प्रशिक्षक बोम्मै थिंगबायजम आणि श्वेता मेघाडी उपस्थित होते.

सक्षमच्या या यशाबद्दल एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदु सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी, तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवचे तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदकासह लक्षणीय यश एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवचे तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदकासह लक्षणीय यश Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०८:१३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".