प्रकरण आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढील चौकशीसाठी वर्ग
मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला. यामुळे कामरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामरा यांच्या विरोधात हा हक्कभंग प्रस्ताव विधान परिषदेत दाखल केला होता. सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावाला आज मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे. हक्कभंग समिती या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल सभागृहाला सादर करेल, त्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.
Kunal Kamra, Privilege Motion, Maharashtra Legislative Council, Eknath Shinde, Ram Shinde, Pravin Darekar, Stand-up Comedian, Political Controversy
#KunalKamra #PrivilegeMotion #EknathShinde #MaharashtraPolitics #LegislativeCouncil #Controversy #StandUpComedy #PravinDarekar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: