धर्मवीर संभाजी बँकेच्या तज्ञ संचालक पदी ॲड. संजय माने आणि शिलचंद्र हजगुडे यांची निवड

 

पिंपरी, पुणे (दि. २८ जुलै २०२५): पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित आणि रौप्य महोत्सवी वर्ष साजऱ्या करत असलेल्या धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदावर ॲड. संजय गणपत माने आणि शिलचंद्र हजगुडे यांची पुढील एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

बँकेचे अध्यक्ष बाबुराव शितोळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ॲड. माने आणि हजगुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ॲड. संजय माने हे अनुभवी आहेत. तसेच, साताऱ्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासपठारच्या कार्यकारी समितीचे आणि शहरातील अनेक सहकारी सोसायट्यांचे व गृहनिर्माण सोसायट्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम पाहतात. शिलचंद्र हजगुडे हे नामांकित सनदी लेखापाल (Chartered Accountant) आहेत, अशी माहिती सरव्यवस्थापक कालिदास सुतार (प्र.) यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


Dharmaveer Sambhaji Bank, Expert Director Appointment, Adv Sanjay Mane, Shilchandra Hasgude, Pimpri Chinchwad, Cooperative Bank, Pune

 #DharmaveerSambhajiBank #PimpriChinchwad #Pune #CooperativeBank #DirectorAppointment #SanjayMane #ShilchandraHasgude #BankingNews

धर्मवीर संभाजी बँकेच्या तज्ञ संचालक पदी ॲड. संजय माने आणि शिलचंद्र हजगुडे यांची निवड धर्मवीर संभाजी बँकेच्या तज्ञ संचालक पदी ॲड. संजय माने आणि शिलचंद्र हजगुडे यांची निवड Reviewed by ANN news network on ७/२८/२०२५ ०९:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".