रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांची योगशास्त्रात राज्यस्तरावर गरुडझेप

 


कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश

रत्नागिरी: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्रातील योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. रत्नागिरी जिल्हा योगासन क्रीडा संघटना आणि महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै २०२५ रोजी आयोजित 'रत्नागिरी जिल्हा योगासन क्रीडा चॅम्पियनशिप २०२५-२६' ची निवड फेरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पार पडली.

या निवड फेरीत रत्नागिरी उपकेंद्रातील बी.ए. योगशास्त्र आणि एम.ए. योगशास्त्र विषयाच्या ४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. या ४ विद्यार्थ्यांमध्ये निकिता लाड (बी.ए. प्रथम वर्ष), पूर्वा पावसकर (बी.ए. द्वितीय वर्ष), महादेव काळे (बी.ए. द्वितीय वर्ष) आणि अपूर्वा मुसळे (एम.ए. द्वितीय वर्ष) यांचा समावेश आहे.

आपल्या योगविषयक कौशल्याच्या जोरावर आणि गुरुजनांच्या भक्कम पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांनी ही विजयश्री खेचून आणली आहे. जाहीर झालेल्या निवड फेरीच्या निकालानुसार, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांमध्ये यश संपादन केले आहे:

  • निकिता लाड: बॅकबेंड इंडिव्हिज्युअल - प्रथम क्रमांक आणि लेग बॅलन्स इंडिव्हिज्युअल - प्रथम क्रमांक

  • मानसी यमगर: ट्रॅडिशनल - द्वितीय क्रमांक

  • अपूर्वा मुसळे: ट्रॅडिशनल - प्रथम क्रमांक आणि सपाईन - तृतीय क्रमांक

  • पूर्वा पावसकर: ट्रॅडिशनल सीनियर - प्रथम क्रमांक

  • महादेव काळे: सीनियर-बी ट्रॅडिशनल - प्रथम क्रमांक

या सर्व चमूला रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सौरभ कुमार नागपूर यांचे योग प्रात्यक्षिकासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय, प्रा. अविनाश चव्हाणप्रा. कश्मिरा दळी यांचेही सहकार्य लाभले आहे. तसेच, राष्ट्रीय योगपटू दुर्वांकुर चाळके आणि रत्नागिरी जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष गौरव आंब्रे यांचेही सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीसाठी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Ratnagiri Sanskrit Sub-Centre, Yoga Shastra, State Level Selection, Kavi Kulguru Kalidas Sanskrit University, Yoga Sports Championship, Student Achievement, Ratnagiri District

#Ratnagiri #Yoga #SanskritUniversity #StateLevel #StudentAchievement #Yogasana #KavikulguruKalidas #Maharashtra #EducationNews

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांची योगशास्त्रात राज्यस्तरावर गरुडझेप रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांची योगशास्त्रात राज्यस्तरावर गरुडझेप Reviewed by ANN news network on ७/२८/२०२५ ०९:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".