मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पुणे-नाशिक मार्गावरील नाणेकरवाडीजवळ एका पिवळ्या रंगाच्या टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक केली जात असल्याची खबर मादक द्रव्य विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गस्ती मोहीम सुरू केली. पथकाने तात्काळ कारवाई करत टेम्पो थांबवला आणि तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी टेम्पोसह २१ वर्षीय श्रेयश प्रदीप चव्हाण आणि २५ वर्षीय राम वेंकट पितळे या दोन आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून २६४ किलो २२६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे १ कोटी ३२ लाख रुपये आहे. आरोपी हे गांजा कुठे घेऊन जात होते आणि कोणाला विकणार होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी ही माहिती दिली असून, या मोठ्या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Drug Bust, Ganja Seizure, Police Action, Narcotics
#PimpriChinchwad #Chakan #DrugBust #GanjaSeizure #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: