नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारताच्या प्रत्युत्तरावर लोकसभेत उद्या, २८ जुलै रोजी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. या विशेष चर्चेसाठी तब्बल १६ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच माहिती दिली होती की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यमंत्रणा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्ष 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेची मागणी करत होते आणि सरकार पहिल्या दिवसापासून यासाठी तयार होते.
लोकसभेत १६ तास चर्चा होणार असून, राज्यसभेत मंगळवारी (२९ जुलै) यावर १६ तासांची चर्चा होईल, असेही श्री. रिजिजू यांनी नमूद केले.
Operation Sindoor, Lok Sabha Debate, Parliament Session, Pahalgam Attack, Kiren Rijiju, Indian Parliament, National Security
#OperationSindoor #LokSabha #Parliament #Terrorism #PahalgamAttack #KirenRijiju #India #NationalSecurity #MonsoonSession

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: