पुणे, ०४ जुलै २०२५: औंध परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ७ रेकॉर्डवरील गुंडांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन कोयते आणि दोन मोटारसायकलींसह एकूण ७ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८/०६/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास औंध येथील विधाते वस्ती येथे काही मित्र गप्पा मारत असताना १२ ते १५ आरोपींनी लाकडी दांडके आणि धारदार हत्यारे घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी हवा फिरवत फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या घटनेप्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २५३/२०२५, भा.न्या.सं.क. ११८ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (२), १९१ (३), १९४ (२) सह म. पो. अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिता मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या पथकाने सुरू केला. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास करत या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढला.
दिनांक ०१/०७/२०२५ रोजी पोलिसांनी १) सागर अशोक गायकवाड (वय २७ वर्षे), २) अक्षय विजय चव्हाण (वय २४ वर्षे), ३) अतुल श्याम चव्हाण (वय २७ वर्षे), ४) रॉबीन दिनेश साळवे (वय २६ वर्षे), ५) समीर अल्लाउद्दीन शेख (वय २६ वर्षे), ६) जय सुनिल चेंगट (वय २१ वर्षे) आणि ७) अभिषेक अरुण आवळे (वय २४ वर्षे) यांना अटक केली. हे सर्व आरोपी औंध परिसरातील कस्तुरबा गांधी वसाहत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील रहिवासी आहेत.
सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
Pune Police, Crime, Arrest, Gangsters, Aundh, Weapon Seizure, Law and Order
#PunePolice #CrimeNews #Aundh #Arrest #Gangsters #WeaponSeizure #Pune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: