मुंबई, ०३ जुलै २०२५: दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी घटकांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुढील ३० दिवसांसाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि तत्सम हवाई उपकरणांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. हा आदेश ०६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते ०४ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशामागे व्हीव्हीआयपींना लक्ष्य करणे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणे यासारखे संभाव्य धोके टाळण्याचा उद्देश आहे.
या बंदीमध्ये ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादींचा समावेश आहे. मुंबई पोलिसांकडून होणारी हवाई पाळत किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी परवानगीनेच ही उपकरणे वापरता येतील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत शिक्षा होईल. या आदेशाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रे, पोलीस ठाण्यांचे सूचना फलक, विभागीय एसीएसपी, झोनल डीसीएसपी कार्यालये आणि नगरपालिका व तहसील कार्यालयांमध्ये प्रती लावून प्रसिद्ध करण्यात येईल.
Mumbai Police, Drone Ban, Public Safety, Security Alert, Mumbai, Law and Order, Aerial Surveillance
#MumbaiPolice #DroneBan #Mumbai #SecurityAlert #PublicSafety #LawAndOrder #NoFlyZone

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: